Shrikrishna Potdar

झ्यांगप्यांग रेडिओ

होस्टेल मध्ये असताना माझा एक मित्र होता. त्याचा एक रेडिओ होता. हा रेडिओ म्हणजे त्याचा जीव कि प्राण होता. हा मित्र हृतिक रोशनचा चाहता होता. त्याचा रेडिओ बऱ्याच वेळी खर खर करत असे. एक दिवस वैतागून मी तो रेडिओ लपवला. आणि ही कविता मला सुचली


एक रेडिओ आहे आमच्या लॉबीची शान,
हा रेडिओ म्हणजे आमचा जीव कि प्राण

परीक्षेच्या काळात तो खूप चांगला गातो 
सुट्टीच्या वेळेत मात्र याचा घसा बिघडतो 

'विविध भारती' वरची गाणी फारच छान 
मालकाला रेडिओतल आहे खूपच ज्ञान 
अहमदनगर एफ एम लागलं, तरी 'रेडिओ मिरची' च पाहिजे 
लॉबीतल्या प्रत्येकानं रेडिओ ऐकलाच पाहिजे 

शाहरुखच्या गाण्याचं आणि रेडिओच वाकड
हृतिकच गाणं लागण्यासाठी आमच देवाकड साकड

कधी रेडिओ रुममध्ये तर कधी असतो बाहेर 
टॉवरपेक्षा वर गेली एरीअलची वायर 

रेडिओ झोपाल्यावरच आम्ही सारे झोपतो 
धूम मधल्या भूपाळीवर आम्ही जागे होतो
दुपारच्या झोपेच खोबर होतं कधी कधी 
रेडिओला ब्रेक मात्र अजिबात नसतो  आधी मधी

चोवीस तास सेवेच व्रत आहे मालकाचं
एवढी गाणी ऐकवतो काय जात तुमच्या बापाचं
रेडिओ चा मालक माणूस मोठा दिलदार 
रेडिओ बद्दल काही बोलाल तर मात्र "खबरदार" 

वैतागून एक दिवस कोणीतरी रेडिओ लपवला  
शांततेच्या पुरस्कारासाठी त्याचा बोलबाला झाला
रेडिओ चा मालक मात्र पार दुखात बुडाला
आणि लॉबीचा प्राण जणू रेडिओ बरोबर गेला

आता आमची लॉबी खूपच शांत वाटते 
त्यात रेडिओची उणीव आम्हाला भासते 

आमचा रेडिओ परत शोधून आणायचाय
'खरखर' ऐकू येताच आमच्याशी संपर्क साधायचाय
आमचा रेडिओ कुणीच नाही लपवू शकत 
कारण आमच्या लॉबीशिवाय तो कुठेच नाही वाजत 

असाच एक रेडिओ आम्हाला जन्मोजन्मी मिळावा 
पण त्याचा आवाज जरा ऐकण्यालायक असावा...

1 टिप्पणी: