Shrikrishna Potdar

अण्णा हजारे : एक वादळ...

     मी पण अण्णा... तू पण अण्णा.... अण्णा अण्णा अण्णा आणि अण्णा....
   हे वादळाहून  काय कमी आहे....??? अण्णा हजारे ना सलाम...
"अण्णा" नावाच एक वादळ
देशभर गोंगावतंय
आपल्याबरोबर सगळ्यांनाच 
जोर जोरात घुमावतंय 

प्रत्येकातली हिम्मत 
त्याने एका आवाजात  जागवलीय
झोपलेल्यांची  झोप त्याने 
बघता  बघता उडवलीय

भ्रष्टाचारी जनावर 
आता सैरावैरा पळतायत 
कोणीच आसरा देत नाही
म्हणून घाबरलेली दिसतायत 

हे वादळ
थोडं वेगळंच आहे
आवाज याचा कमी 
आणि शक्ती जास्त आहे

वादळान या ठरवलंय 
की आधी सारा कचरा काढायचा
आणि देशाचा झेंडा मग
मानान फडकावयाच...

बघा जरा तुम्हीपण 
 या वादळात या 
   "मी पण अण्णा" चा नारा
हृदयात घुमू द्या...
जयहिंद !!! 

आरोळी...

  बस... खूप सहन केला भ्रष्टाचार आता वेळ आलीय संग्रामाची विनंत्या, उपोषण खूप केली. आता मलाही वाटतंय कि आरोळी देण्याची वेळ आलीय
 खूप ऐकून घेतल तुमचं
आता आरोळी हि ऐका
विनाश तुमचा करेल आता
तुमचाच लाडका पैका

काडीभराची लाज होती 
ती पण तुम्ही सोडलीत 
धिंडवडे  निघाले तरी
खोड नाही मोडलीत 

खालेल्या मिठाला तर 
कधीच नाही जागलात 
स्वताचे चीचले पुरवायला
देश विकायला काढलात 

ध्यानात ठेवा आरोळी ही
तुमची कानठीळी बसवेल
आणि तरीही नाही ऐकलत
तर आयुष्यातून उठवेल 

विनंत्या आणि मागण्यांची भाषा
तुम्हाला नाहीच रे  कळणार
चिता बघाच तुमच्या आता
सरनाशिवाय जळणार

वाट...

माहित नाही हि कविता कशी आणि का सुचली एक दुसरी कविता करता करता हि कविता तयार झालीय...
 इतक्या छान ठिकाणी कधी कोणाची वाट पाहण्याचं भाग्य अजून तरी लाभल नाही :) पण अशा ठिकाणी कोणाची तरी वाट पहायला नक्कीच आवडेल 
 
एक गोष्ट तुला सांगायचीच राहिली 
त्याच झाडाखाली आज परत वाट पहिली

गंमत म्हणजे झाडाने आज माझी सोबत दिली 
जुन्या आठवणींची आम्ही उजळणी केली

रानातल्या त्या फुलांनी तुझीच वाट पाहिली 
तू आज येणारच असे मला सांगत राहिली

वारापण तुज्यासंगे यायला आतुर झाला होता
सळसळ करीत उगीचच धावत पळत होता

तळ्यातल ते पाणी काठाशी येवून घुटमळत होतं 
थोड्या थोड्या वेळानी काठावर डोकावत होतं

सूर्य पण शेवटी  हसून मला म्हटला 
किती वेळ थांबू आता उशीर खूप झाला

साऱ्यांचा निरोप घेवून घरी परत फिरलो
शहरातल्या गर्दीत पुन्हा हरवून गेलो....