Shrikrishna Potdar

फाटकं बनियान

"ही माझी पहिली कविता...
एक दिवस नाश्ता करायला कॉलेज कॅन्टीन वर गेलो आणि तिथे  स्पर्धा परीक्षेची तयारी करणार एकजण पाहिला. त्याच्या  शर्टातून मला  त्याचं फाटलेल बनियन दिसलं आणि हा विचार मनात आला "
ही कविता त्या अनोळखी अधिकाऱ्याला...


विसाव्यावर नाश्ता करताना,
फाटकं बनियान घातलेला भावी अधिकारी पाहिला
M.P.S.C. चा विचार डोक्यात घर करून राहिला 
कोणाच्या हातात चिटोऱ्या, कोणाच्या हातात झेरॉक्स
डोक्यात एकच विचार, फाटकं तुटक जीवन आता करायचं आहे खल्लास 

आज नाही उद्या मिळल, माझ पण भाग्य उद्या उजडेल

लोकांच कल्याण आणि समाजाची सुधारणा 
पण P. S. I.  शिवाय लक्षच हटेना 

M.P.S.C तल्या अधिकाऱ्यांचा पण एकच ठेका 
P.S.I. झालास तरच मोठा होशील लेका

शेतकऱ्याचा पोरगा अधिकारी होणार
आणि बाप पण पोरावर डोळे लावून बसणार

आणि...
बऱ्याच दिवसांनी एकजण अधिकारी झाला
लोकांसाठी खूप धावपळ करू लागला 
धावपळ करता करता थकून गेला 
तेवढ्यात लक्ष एका बंगल्याकड गेलं
त्या साहेबाचा पगार पण माझ्या एवढाच हे लक्षात आलं
"लोकांसाठी बरंच केलं माझं घर राहून गेलं "

आणि मग...
त्या घराच्या नादात 
फाटकं बनियान आठवू लागलं...
पगार कमी असून सुद्धा घर बनू लागलं
शेतकरी समाज त्यावेळी नाही आठवलं

आरं तुझा संसार सुराला लागला
पण दुसऱ्याच्या घरावर नांगर फिरला

अधिकारी झाल म्हणजे सारं काही खपत नसतं
आपलच मन मग, आपल्यालाच खात असतं

अधिकारी हो पण अभिमानान जग
स्वतःच्या कर्तुत्वावर जिंकायचं असत जग
निस्वार्थी झालास तरच काहीतरी करशील
"शेतकऱ्याचा पोरगा मी अभिमानान सांगशील"

६ टिप्पण्या: