आज माझ्या काही मित्रांना मी खूप निराश पाहिलं. 'जीवन म्हणजे एक खेळ' हेच जणू ते विसरले होते असे वाटल. 'युवकांनी लढायचं नाही तर मग लढायचं कोणी?' असाही एक विचार डोक्यात आला. वाटल कि त्यांना सांगाव 'अरे जागे व्हा...!!!'
उठ युवका उठ
मुक्त व्हायला शिक
मूर्ख विचाराच्या साखळ्या
तोडायला शिक
जागा होवून बघ जरा
सगळ काही शक्य आहे
यश यश म्हणतात ते
दोन पावला एवढंच दूर आहे
चुकलास किंवा जिंकलास तरी
लोक असेच बोलत राहणार
लोकांच्या इशाऱ्यावर नाचणारी
तू बाहूली का बनणार?
नशिबाचे फासे
तू पण पालटवू शकतोस
शून्यातन विश्व
तू पण घडवू शकतोस
तुझ्यात सुद्धा आहे
जिंकायची ती धमक
ओळख फक्त आता
तुझ्या मनगटातली ताकत
गरज आहे फक्त तुला
जागे होण्याची
मूर्ख विचाराच्या साखळ्या
जाणीव पूर्वक तोडायची
उठ युवका उठ
तू परत जागा हो
रडत नको बसू आता
विजेता हो !!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा