बस... खूप सहन केला भ्रष्टाचार आता वेळ आलीय संग्रामाची विनंत्या, उपोषण खूप केली. आता मलाही वाटतंय कि आरोळी देण्याची वेळ आलीय
खूप ऐकून घेतल तुमचं
आता आरोळी हि ऐका
विनाश तुमचा करेल आता
तुमचाच लाडका पैका
काडीभराची लाज होती
ती पण तुम्ही सोडलीत
धिंडवडे निघाले तरी
खोड नाही मोडलीत
खालेल्या मिठाला तर
कधीच नाही जागलात
स्वताचे चीचले पुरवायला
देश विकायला काढलात
ध्यानात ठेवा आरोळी ही
तुमची कानठीळी बसवेल
आणि तरीही नाही ऐकलत
तर आयुष्यातून उठवेल
विनंत्या आणि मागण्यांची भाषा
तुम्हाला नाहीच रे कळणार
चिता बघाच तुमच्या आता
सरनाशिवाय जळणार
Bhair ahe raooo
उत्तर द्याहटवाKhup Chhan! :)
उत्तर द्याहटवाmasta...agadi manaatla!
उत्तर द्याहटवा