मी पण अण्णा... तू पण अण्णा.... अण्णा अण्णा अण्णा आणि अण्णा....
हे वादळाहून काय कमी आहे....??? अण्णा हजारे ना सलाम...
"अण्णा" नावाच एक वादळ
देशभर गोंगावतंय
आपल्याबरोबर सगळ्यांनाच
जोर जोरात घुमावतंय
प्रत्येकातली हिम्मत
त्याने एका आवाजात जागवलीय
झोपलेल्यांची झोप त्याने
बघता बघता उडवलीय
भ्रष्टाचारी जनावर
आता सैरावैरा पळतायत
कोणीच आसरा देत नाही
म्हणून घाबरलेली दिसतायत
हे वादळ
थोडं वेगळंच आहे
आवाज याचा कमी
आणि शक्ती जास्त आहे
वादळान या ठरवलंय
की आधी सारा कचरा काढायचा
आणि देशाचा झेंडा मग
मानान फडकावयाच...
बघा जरा तुम्हीपण
या वादळात या
"मी पण अण्णा" चा नारा
हृदयात घुमू द्या...
जयहिंद !!!