गोव्यामध्ये असताना एक दिवस स्वतः पोहे बनवले ... पोहे घेवून बसलो आणि डोक्यात खूप सारे विचार घुमू लागेल आणि मग कागद आणि पेन घेवून बसलो...
कोटी कोटी धन्यवाद
गोव्यातल्या आचाऱ्याला
हॉटेलच्या मालकाला
वाढप्याला आणि उडप्याला
शिकलोच नसतो आयुष्यात
स्वयंपाक कधी करायला
भात कुकरला लावायला
आमटीला फोडणी द्यायला
झिजून झिजून गेले
कित्येक हॉटेलचे चमचे
एकाने पण दिले नाही
जेवण कडी आवडीचे
मीठ कधी कमी
तर कधी जास्त
आमच्या हॉटेलचे दर मात्र
सगळ्यापेक्षा स्वस्त
मोठ्या हॉटेलचा
टेंभडाच भारी
बिल असत जेवणाचं
टेबलावर नुसतीच न्याहारी
घरचे रोज विचारतात
कधी होणार मी जाड्या
डिशमधल्या भाज्या
मैद्याच्या चपात्या
कितीजरी खाल्ल्या तरी
हातपाय काड्या
उशिरा सुचलं
पण शहाणपण आलं
जेवण बघावं बनवून
असं वाटायला लागलं
करून बघितलं धाडस
आणि यशपण आलं
घरच्या घरी आता
जेवण बनू लागलं
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा