Shrikrishna Potdar

वाट...

माहित नाही हि कविता कशी आणि का सुचली एक दुसरी कविता करता करता हि कविता तयार झालीय...
 इतक्या छान ठिकाणी कधी कोणाची वाट पाहण्याचं भाग्य अजून तरी लाभल नाही :) पण अशा ठिकाणी कोणाची तरी वाट पहायला नक्कीच आवडेल 
 
एक गोष्ट तुला सांगायचीच राहिली 
आज त्याच झाडाखाली मी परत वाट पहिली

गंमत म्हणजे त्याच झाडानं आज माझी सोबत दिली 
जुन्या आठवणींची आम्ही पुन्हा उजळणी केली

रानातल्या त्या फुलांनी तुझीच वाट पाहिली 
तू येणारच आज असे मला सांगत राहिली

वारापण तुज्यासंगे यायला आतुर झाला होता
सळसळ करीत उगीचच धावत पळत होता

तळ्यातल ते पाणी काठाशी येवून घुटमळत होतं 
थोड्या थोड्या वेळानी काठावर डोकावत होतं

सूर्य पण शेवटी मला हसून म्हणाला
किती वेळ थांबू आता खूप उशीर झाला

साऱ्यांचा निरोप घेवून मीही परत फिरलो
शहरातल्या गर्दीत पुन्हा हरवून गेलो....

1 टिप्पणी: