Shrikrishna Potdar

फाटकं बनियान

"ही माझी पहिली कविता...
एक दिवस नाश्ता करायला कॉलेज कॅन्टीन वर गेलो आणि तिथे  स्पर्धा परीक्षेची तयारी करणार एकजण पाहिला. त्याच्या  शर्टातून मला  त्याचं फाटलेल बनियन दिसलं आणि हा विचार मनात आला "
ही कविता त्या अनोळखी अधिकाऱ्याला...


विसाव्यावर नाश्ता करताना,
फाटकं बनियान घातलेला भावी अधिकारी पाहिला
M.P.S.C. चा विचार डोक्यात घर करून राहिला 
कोणाच्या हातात चिटोऱ्या, कोणाच्या हातात झेरॉक्स
डोक्यात एकच विचार, फाटकं तुटक जीवन आता करायचं आहे खल्लास 

आज नाही उद्या मिळल, माझ पण भाग्य उद्या उजडेल

लोकांच कल्याण आणि समाजाची सुधारणा 
पण P. S. I.  शिवाय लक्षच हटेना 

M.P.S.C तल्या अधिकाऱ्यांचा पण एकच ठेका 
P.S.I. झालास तरच मोठा होशील लेका

शेतकऱ्याचा पोरगा अधिकारी होणार
आणि बाप पण पोरावर डोळे लावून बसणार

आणि...
बऱ्याच दिवसांनी एकजण अधिकारी झाला
लोकांसाठी खूप धावपळ करू लागला 
धावपळ करता करता थकून गेला 
तेवढ्यात लक्ष एका बंगल्याकड गेलं
त्या साहेबाचा पगार पण माझ्या एवढाच हे लक्षात आलं
"लोकांसाठी बरंच केलं माझं घर राहून गेलं "

आणि मग...
त्या घराच्या नादात 
फाटकं बनियान आठवू लागलं...
पगार कमी असून सुद्धा घर बनू लागलं
शेतकरी समाज त्यावेळी नाही आठवलं

आरं तुझा संसार सुराला लागला
पण दुसऱ्याच्या घरावर नांगर फिरला

अधिकारी झाल म्हणजे सारं काही खपत नसतं
आपलच मन मग, आपल्यालाच खात असतं

अधिकारी हो पण अभिमानान जग
स्वतःच्या कर्तुत्वावर जिंकायचं असत जग
निस्वार्थी झालास तरच काहीतरी करशील
"शेतकऱ्याचा पोरगा मी अभिमानान सांगशील"

झ्यांगप्यांग रेडिओ

होस्टेल मध्ये असताना माझा एक मित्र होता. त्याचा एक रेडिओ होता. हा रेडिओ म्हणजे त्याचा जीव कि प्राण होता. हा मित्र हृतिक रोशनचा चाहता होता. त्याचा रेडिओ बऱ्याच वेळी खर खर करत असे. एक दिवस वैतागून मी तो रेडिओ लपवला. आणि ही कविता मला सुचली


एक रेडिओ आहे आमच्या लॉबीची शान,
हा रेडिओ म्हणजे आमचा जीव कि प्राण

परीक्षेच्या काळात तो खूप चांगला गातो 
सुट्टीच्या वेळेत मात्र याचा घसा बिघडतो 

'विविध भारती' वरची गाणी फारच छान 
मालकाला रेडिओतल आहे खूपच ज्ञान 
अहमदनगर एफ एम लागलं, तरी 'रेडिओ मिरची' च पाहिजे 
लॉबीतल्या प्रत्येकानं रेडिओ ऐकलाच पाहिजे 

शाहरुखच्या गाण्याचं आणि रेडिओच वाकड
हृतिकच गाणं लागण्यासाठी आमच देवाकड साकड

कधी रेडिओ रुममध्ये तर कधी असतो बाहेर 
टॉवरपेक्षा वर गेली एरीअलची वायर 

रेडिओ झोपाल्यावरच आम्ही सारे झोपतो 
धूम मधल्या भूपाळीवर आम्ही जागे होतो
दुपारच्या झोपेच खोबर होतं कधी कधी 
रेडिओला ब्रेक मात्र अजिबात नसतो  आधी मधी

चोवीस तास सेवेच व्रत आहे मालकाचं
एवढी गाणी ऐकवतो काय जात तुमच्या बापाचं
रेडिओ चा मालक माणूस मोठा दिलदार 
रेडिओ बद्दल काही बोलाल तर मात्र "खबरदार" 

वैतागून एक दिवस कोणीतरी रेडिओ लपवला  
शांततेच्या पुरस्कारासाठी त्याचा बोलबाला झाला
रेडिओ चा मालक मात्र पार दुखात बुडाला
आणि लॉबीचा प्राण जणू रेडिओ बरोबर गेला

आता आमची लॉबी खूपच शांत वाटते 
त्यात रेडिओची उणीव आम्हाला भासते 

आमचा रेडिओ परत शोधून आणायचाय
'खरखर' ऐकू येताच आमच्याशी संपर्क साधायचाय
आमचा रेडिओ कुणीच नाही लपवू शकत 
कारण आमच्या लॉबीशिवाय तो कुठेच नाही वाजत 

असाच एक रेडिओ आम्हाला जन्मोजन्मी मिळावा 
पण त्याचा आवाज जरा ऐकण्यालायक असावा...

कविता

मी कविता लिहायला कधी आणि कशी सुरुवात केली असा विचार एक दिवस डोक्यात आला मी खूप विचार केला पणन उत्तर काही सापडलं नाही सापडली ती ही "कविता "

आता आठवत नाही मला, कशी कविता मी केली 
मनातलं बरंच काही, शब्दांत मांडून गेली 

जिंकलो कधी जीवनात, तरी कविता झाली 
हरलो कधी डावात, तरी कविता झाली 

एकटेपणावर हसलो, तरी कविता झाली 
जमवत हरवलो, तरी कविता झाली

पावसात चिंब भिजलो, तरी कविता झाली
प्रेमात कधी बुडलो, तरी कविता झाली

आठवणीतून फिरलो, तरी कविता झाली 
भविष्यात कधी शिरलो, तरी कविता झाली

कविता वाचताना पण, कविता झाली 
कवितेवरून कविता, ही जन्माला आली...


प्रतिमा http://goo.gl/aGIXF

मलाही एक दिवस पाऊस व्हायचंय

कॉलेजमधून एक दिवस घरी येताना खूप भिजलो आणि घरी पोहोचलो आणि एक विचार डोक्यात आला 
"होय मलाही एक दिवस पाऊस व्हायचंय"

रिमझिम पाऊस

होय मलाही एक दिवस पाऊस व्हायचंय...

पहिल्या पावसासारखं रिमझिम बरसायचंय 
कडीकापारीतून खळखळत वहायचंय
हिरव्या शालुनी धरतीला नटवायचंय 
पानाफुलाशी झिम्मा फुगडी खेळायचंय
होय मलाही एक दिवस पाऊस व्हायचंय...

पोरांच्या किलबिलाटात सामील व्हायचंय
मोठ्यांच्या कोपाचं कारण व्हायचंय
ग्रासलेल्या जीवाना शांत करायचंय 
जीवांच्या मिलनाच कारण व्हायचंय
होय मलाही एक दिवस पाऊस व्हायचंय...

कवी कल्पनेतून कधी कागदावर उतरायचंय
कुंचल्यातल्या  रंगानी कॅनवासवर उमटायचय
गानांऱ्याच्या साथीला, धून बनून गायचंय
होय मलाही एक दिवस पाऊस व्हायचंय...